एरंडोल परिसरात दुबार पेरणीचे संकट : शेतकरी राजा चिंतेत….!

खडके बु. ता.एरंडोल प्रतिनिधी ( वाल्मिक पाटील) :- सध्या कोरोना सारख्या संकटात एरंडोल तालुक्यात काही ठिकाणी तर खडके बु. परिसरात गेल्या १२ दिवसापासून पेरणीवर पाऊस नसल्याने हलक्या जमिनीवर पिके अक्षरशः जळू लागल्याने शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून शेतकरी हवालदिल झाला आहे , रोज ढगाळ वातावरण निर्माण होत असून पाऊस येईल असे वाटते परंतु पाऊस हुलकावणी देत निघून जात आहे , त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे यावर्षी चांगला पाऊस होण्याचे संकेत मिळाले असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी, मका,सोयाबीन,उडीद, मूग,आदींची पेरणी करून कोरड वाहू कपाशी, मका कोरडी पिके कोमेजून जात असल्याने काहींना कोऱ्या लागल्या आहे,आज ना उद्या पाऊस आला नाही तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहणार की काय या विवनचनेत शेतकरी राजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे . मात्र आजही पाऊस आला तरी बियाणे मरच्या ठिकाणी दुबार बियांनाची सांधा सांध करावी लागणार आहे. त्यामुळे आर्थिक खर्चाचा बोजा लागणार असून शासनाने दुबार पेरणी साठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी खडके बु परिसरातील हवालदिल झालेले शेतकरी करित आहे.

3 thoughts on “एरंडोल परिसरात दुबार पेरणीचे संकट : शेतकरी राजा चिंतेत….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *