मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव शिवसेनेच्यावतीने नवीन कोविड सेंटरला बेड मदत करत रुग्णालय परिसरात केलेे वृक्षारोपण…!

चाळीसगांव प्रतिनिधी – कुंदन गवळी :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज चाळीसगाव शिवसेनेच्या वतीने चाळीसगाव येथील नवीन कोविड रुग्णालयासाठी बेड देण्यात आले तसेच रुग्णालय आवारात वृक्षारोपण केले. तसेच धुळे रोड येथील श्रीराम नगर येथे देखील वृक्षारोपण करण्यात आले.

 

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ‘वाढदिवसाच्या निमित्तानं मिळणाऱ्या सर्व शुभेच्छा मी कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं होते तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हस्ते देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत कुठेही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लावू नयेत किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहनही त्यांनी शिवसैनिक व हितचिंतकांना केलं होते त्यानुसार चाळीसगाव शिवसैनिक पदाधिकारी यांनी चाळीसगाव येथे लोकसहभागातून होणार्या नवीन कोविड सेंटरला नविन बेड देत रुग्णालयाच्या परिसरातच वृक्षरोपण करून केलेल्या आवाहनानुसार वाढदिवस साजरा केला. यात प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी बी. पी. बाविस्कर,  ग्रामीण वैद्यकीय अधिकारी देवराम लांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील,तालुका प्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालुका संघटक सुनील गायकवाड, माजी नगरसेवक संजय ठाकरे, उपशहर प्रमूख शैलेंद्र सातपुते, रामेश्वर चौधरी, रघुनाथ कोळी, प्रभाकर ओगले, नकुल पाटील, दिनेश विसपुते, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सविता कुमावत व महिला आघाडी, शिवसैनिक उपस्थित होते.

2 thoughts on “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव शिवसेनेच्यावतीने नवीन कोविड सेंटरला बेड मदत करत रुग्णालय परिसरात केलेे वृक्षारोपण…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *