ऑनलाईन राज्य स्तरीय महापुरुष वेशभूषा स्पर्धेत भुसावळ येथील यश विकास भराडीया राज्यात दुसरा…!

भुसावळ प्रतिनिधी :- येथील गीता परिवारातर्फे २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित ऑनलाईन राज्य स्तरीय महापुरुष वेशभूषा स्पर्धेत भुसावळ केंद्रातील यश विकास भराडीया राज्यात दुसरा,

भुसावळ येथील कोलते फाउंडेशन द वर्ल्ड स्कूल मधील इयत्ता ४थीत शिक्षण घेत असलेल्या यश विकास भराडिया याने महापुरुष वेशभूषा स्पर्धेत सहभागी होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हुबेहूब चित्र स्वतःहा मध्ये साकारत व त्यांचे विचार आयोजकांसमोर मांडत त्यांनी भुसावळ केंद्रातून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

त्याप्रसंगी गीता परिवाराचे केंद्र अध्यक्षा सौ कल्पना मंडोरे यांच्यासह कार्यक्रमास्थळी प्रमुख पाहुणे म्हणून गीता परिवाराचे गीता विशारद डॉ.आशुजी गोयल , राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा उत्तरभारत प्रमूख हे उपस्थित होते , तर कार्यक्रमास अंजली तापडिया पश्चिम महाराष्ट्र प्रमुख , शोभा हरकूट विदर्भ प्रमुख , प्रमिला माहेश्वरी माध्यभारात प्रमुख , डॉ. राजकुमार लड्डा मराठवाडा प्रमुख , रेखा मुंदडा खान्देश प्रमुख
आयोजक उपस्थित होते.

RSW LIVE न्युज तर्फे यश चे अभिनंदन व पुढील शौक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *