कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई साठी जिल्ह्यातील क्लासवन अधिकारी उतरले रस्त्यावर / तर कासोद्यात शासनाच्या आदेशाची पायमल्ली….!

कासोदा ता. प्रतिनिधी :- गेल्यावर्षी कोरोना संसर्गजन्य सथारोगाने संपूर्ण देशासह महाराष्ट्राला वेठीस पकडले होते . थोडाकाळ थंडावलेल्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून प्रशासनाने पुन्हा निर्बंध घातला आहे,

कासोद्यातील बिरलाचौकतील गर्दी … प्रशासन प्रयत्न करीत असतांनाही नागरिक नियमांचे पालन करत नसल्याचे पाहून, आज जिल्हाधिकारी अभिजीतजी राऊत , पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे सर यांनी स्वत: शहरात फिरून कारवाई केली.जिल्हाधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर थेट स्वत: मैदानात उतरून कारवाई केली होती. यानंतर आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहरात फिरून विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई केली. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, वाहतूक शाखेचे निरिक्षक देवीदास कुनगर व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. शहरातील चित्रा चौक, गोलाणी मार्केट परिसरासह अन्य भागांमध्ये आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.

असली तरी जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत यांच्या आदेशाची एरंडोल तालुक्यातील कासोद्यात पायमल्ली होतांना दिसत आहे , तरी स्थानिक प्रशासनासह तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीयाकडे  दुर्लक्ष केल्याचे दिसते . एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या कासोद्या गावाचा आज बाजाराचा दिवस असून  यात कुठल्याही प्रकारची भीती दिसून येत नाही , थेट बिर्लाचौकात मेन रोडवर गर्दी दिसून येत आहे, याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *