देव तारी त्याला कोण मारी / जळगाव GMC कोव्हिड- १९ लॅब च्या डॉ.प्रियंका पाटिल यांच्या कारचा अपघात….!

मुकटी ता.धुळे प्रतिनिधी :-  येथून जवळच असलेल्या हॉटेल दिलीप नजीक धुळे – नागपूर हायवे  क्र. ६ वर राजकोट येथे प्लायवूड घेऊन जाणारी  आंध्रप्रदेश आरटीओ पासिंग असलेली ट्रक क्रं. ए.पि.१६ टी.इ. ४५५९ हीचे किल्नर साईट चे मागील चाक पंक्चर झाल्याने चालकाने गाडी आपल्या साईटवर उभी करून ठेवली असता. उर्वरित जवळचे चाक बदलवन्याचे काम सुरू होते.

तोवर राजस्थान पासिंग ची लोखंड घेऊन जाणारा ट्रॉला क्रं.आर.जे. ०४ जी.ए. ६१३१ याने उभ्या असलेल्या गाडीस  ओहरटेक करण्याच्या हेतूने जात असतांना गाडीवरील नियंत्रन सुटून जळगांव Gmc लॅबच्या डॉ. प्रियांका पाटील या आपल्या स्वतःच्या ह्युंदाई कंपनीच्या आय -10 क्र.एम. एच. १८ ए.जे.७८२२  यागाडीने धुळे येथून जळगांव कडे निघाल्या असता समोरील गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने यांच्या कार ला ड्रायव्हर साईटने पूर्ण बाजू घसरल्याने कारची एक साईटचे पूर्णपणे नुकसान झाले व गाडी ट्रॉला मध्येअडकून पडली. असता डॉ.प्रियांका पाटिल या अपघातात बाल-बाल बचावल्या असून कुठल्याही प्रकारची खरोच त्यांना आली नाही. परंतु त्यांच्या कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे , अपघात झाल्यानंतर रस्त्यावर दोन्ही बाजूने लांबलचक रांग लागल्या नंतर डाव्याबाजूने रस्त्याचे काम सुरू असून त्यावर खडी पसरवलेली होती तरी पर्यायी मार्ग अवलंबून दोन्ही बाजूच्या गाड्या त्यारस्त्याने मार्गस्थ झाल्या,  अपघाता नंतर डॉ.प्रियंका पाटील यागाडी बाहेर निघाल्या नंतर बघ्यांची गर्दी झाली व डॉ.पाटील यांना सर्वांनी धीर दिला . 

रस्त्याचे काम सुरू असून दोन फुट खोल अशी साईट पट्टी खोल आहे दररोज मोटर सायकल घसरून अपघात होतात , निष्पाप नागरिकांना रस्त्याचे बळी बनवले जात असून सदर ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा,  व साईटपट्टीवर मुरूम टाकण्यात यावा असी घटनास्थळी आजूबाजूच्या परिसरातील  लोकांमध्ये एकच चर्चा सुरू होती ..

डॉ. प्रियांका पाटील….

मी मागील ८ महिन्यांपासुन जळगाव येथील GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे कोरोना स्टेस्ट करण्यासाठी GMC मध्ये लॅब ला काम बघत असून दररोज ह्याच रस्त्याने ये-जा करत असून दररोज  काहींना काही पाहायला मिळते ,  पण आज स्वतःहा सोबत घटना घडली त्यावेळी समजून आलेकी रस्त्याच्या नादुरुस्ती मुळेही काही अपघात होतात. आज मी ही गाडी साईट पट्टीवर उतरवू शकली असते ,  परंतु साईड पट्टी दिड ते दोन फूट खोल असल्याने आज माझ्या कार ला अपघात झाला आहे , रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे एकच मागणी असे डॉ. प्रियांका पाटील यांनी RSW लाईव्ह न्युज सोबत बोलतांना सांगितले…!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *