जळगाव करांनो सावधान : वैद्यकीय सेवा पुरविणारे तब्बल ४८ जण पोसिटीव्ह…!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :- 

२७ डाॅक्टरांसह ४८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह….! 

जळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाचा उपचार करणारे २७ डाॅक्टरांसह ४८ कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आले. तसेच दिव्या जळगावचे प्रतिनिधींनी सिव्हिल च्या कोरोना योध्दांची सुरक्षा रामभोरेसे असल्याचे व्हिडिओ ही प्रसारित केले होते.

त्यात कोरोनाचे उपचार करणारे कर्मचारी यांना हॅन्ड ग्लॅप्स व मास्क हेच त्यांच्या जवळ उपलब्ध असल्याचे दिसून आले. त्यांना काही सुरक्षा कवच दिले असते तर कदाचित इतक्या मोठ्या संख्येत सिव्हिलचे कर्मचारी ही पॉसिटीव्ह आले नसते.

सिव्हिलमध्ये सर्वच बेड फुल्ल आहे. पूर्वी बेड मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत होते. तर आता ही रुग्णसंख्या वाढली असल्याने उपचारच करणारेच डॉक्टरच बाधित झाल्याने उपचार करणार कोण याची चिंता व्यक्त केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ४८ कर्मचारी गेल्या चार दिवसांत बाधित झाले आहेत. यात १७ निवासी डॉक्टर व विविध विभागाचे ९ डॉक्टर, नर्सिंग १०, टेक्निशियन ३, फार्मासिस्ट १ तर नर्सिंग स्टाफ प्रमोशनचे ७ कर्मचारी अशा एकूण ४८ जणांचा समावेश आहे.

तर जिल्ह्यात स्वॕब घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा ९७९ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आज जिल्ह्यात ९७९ नवीन रुग्ण आढळले असून  एरंडोल तालुक्यात ९३ रुग्ण आढळून आले आहेत.

आज जिल्ह्यात दिवसभरात ६६७ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण ६१६०२ रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या ५०८७ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या ७०६२७ झालेली आहे. जिल्ह्यात आज ६ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १४४४ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

नागरिकांनी मास्क व सेनीटायसर चा वापर करून प्रशासनाचे नियम पाळावे. असे आव्हान जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *