दापोरा येथे लग्नाला हजेरी लावून टाकळी कडे परततांना दुचाकीला अंजनी धरणाजवळ अपघात ; दुचाकीचालक ठार…!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :- येथील अंजनी धरणाजवळ अपघात होऊन एक जागीच ठार झाल्याने परिसरात खळबळ

सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

दापोरा ता.जळगाव येथे लग्नाला हजेरी लावल्यानंतर दुचाकीने टाकळी ता.पाचोरा येथे जाणार्या दीपक प्रकाश वाणी वय-४३ रा. दापोरा ता.जि.जळगांव यांच्या दुचाकीला अंजनी धरणाजवळ अपघात होऊन दिपक वाणी हे जागीच ठार झाले.ही घटना सोमवारी संध्याकाळी ६:१५ वाजेच्या सुमारास घडली. एरंडोल पोलीस स्टेशनला राञी उशिरा पर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

एरंडोल पोलिस स्टेशन सूञांकडून मिळालेली माहीती अशी की दिपक प्रकाश वाणी हे सोमवारी दापोरा ता.जळगाव येथे नातेसंबंधातील लग्नाला गेले होते. लग्न आटोपल्यावर ते दुचाकीने टाकळी ता.पाचोरा येथे एरंडोल मार्गे परत जात असतांना संध्याकाळी त्यांची दुचाकी अंजनी धरणाच्या पाटात कोसळली त्यात ते जागीच ठार झाले.

 याबाबत एरंडोल पोलीसांना माहीती मिळताच संदीप सातपुते,अनिल पाटील,राजेश पाटील हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. यावेळी कासोद्याकडून परत येणारे प्रदीप हिम्मत मराठे यांनी मदतकार्य केले.

याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला भाऊसाहेब उर्फ अनिल प्रकाश वाणी यांनी फिर्याद दिल्यावरून अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. माञ दुचाकीचा क्रमांक समजू शकला नाही. मृत दिपक वाणी हे शेतकरी होते असे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,भाऊ,पत्नी व २मुले असा परिवार आहे.

सहायक फौजदार विकास देशमुख व जुबेर खाटीक हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *