ग्रामीण भागासह शहरात दक्षता समिती गठीत करा : सहा.जिल्हाधिकारी सौ.तृप्ती धोडमिसे…!

जळगाव प्रतिनिधी :-  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी वारंवार विविध आदेश पारित केलेले आहेत.

त्याचप्रमाणे सदर विषाणूचा संसर्ग लक्षात घेता हा संसर्ग स्थानिक पातळीवर रोखण्यात सोपं व्हावे यासाठी खबरदारीचा व उपयोजनाचा भाग म्हणून जिल्ह्यातीत जळगाव,जामनेर तालुक्यामध्ये व गाव पातळीवर ग्रामपंचायत निहाय व शहरी भाग नगरपरिषद नगरपंचायत ठिकाणी प्रभाग स्तरीय दक्षता पथक आणि नगरपरिषद ठिकाणी कोरोणा नियंत्रण समिती अशा द्वितीस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी असे आदेश काल जिल्हाधिकारी यांनी काढले.

सर्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे पत्र क्रमांक दिनांक १४ मार्च २०२० कोरोना विषाणू covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सात रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा दिनांक १३ मार्च २०२० लागू करून खंड २,३ व ४ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे तसेच जळगाव जिल्ह्यात कोरोनाविषाणू covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी जळगाव उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना म्हणून घोषित केले आहे व विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी हा आदेश काढला आहे.

 

अशी असणार समिती…

 

गाव पातळीवर सरपंच तर नगरपरिषद ठिकाणी नगराध्यक्ष हे समितीचे अध्यक्ष राहतील. ग्रामसेवक, मुख्याधिकारी समितीचे सदस्य सचिव असतील त्याच बरोबर तलाठी, शिक्षक या समितीचे सदस्य असतील.

समितीवर असणार ही जबाबदारी…

 

१)प्रभाग निहाय कोरोना दक्षता पथके स्थापन कराव्यात. २)सोयीनुसार समितीच्या स्वरूपात बदल करता येईल तसेच ही पथके स्थापन केल्याची माहिती संबंधित गटविकास अधिकारी ग्रामीण व मुख्याधिकारी यांना कळविण्यात यावे.

३)नियंत्रण समितीलाच लोकसंख्येनुसार प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक दक्षता पथके स्थापन करण्याचा अधिकार आहे.

४) सदस्यांची विशेष सभा घेऊन गाव,नगर स्तरीय कोरणा नियंत्रण समिती तसेच प्रभाग निहाय कोरोना दक्षता पथके स्थापन केलेली नोंद प्रोसिडींग मध्ये घेण्यात यावी.

५) तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे दररोज कोरोनाच्या माहितीची देवाणघेवाण करून प्रभाग स्तरीय दक्षता पथकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात.

६) गावात गर्दीचे समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेणे किंबहुना गावांमध्ये नागरिकांची गर्दी होईल असे कोणतेही उपक्रम, कार्यक्रम होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेणे.

७) ग्रामीण भागातील व शहरी भागातील आठवडे बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात यावे.

८) गावातील नागरिक यांना रोगाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आल्यास निम्नस्वाक्षरीत तहसीलदार जळगाव,जामनेर,आरोग्य अधिकारी,जळगाव,जामनेर तसेच त्यांना तात्काळ कळवावे तसेच त्यांना CCC / DCHC/DHC रुग्णालयात दाखल करण्यात यावे.

९)नियंत्रण समितीची बैठक दर सोमवारी घेण्यात यावे सदर बैठकीचे इतिवृत्त सदस्य सचिव यांनी गटविकास अधिकारी ग्रामीण,मुख्याधिकारी नगरपरिषद शहरी यांच्याकडे सादर करावे.

१०) प्रतिबंधात्मक क्षेत्र,गृह विलीनीकरण याविषयी नियमांचे पालन न झाल्यास आयपीसी १८८,२६९,२७० खाली गुन्हे दाखल करणे.

प्रभाग निहाय कोरोना दक्षता पथक…

ग्रामपंचायत सदस्य,नगरसेवक प्रभाग निहाय, महिला बचत गट सदस्य, शिक्षक, जि प,प शाळा, आशा वर्कर,आरोग्य सेवक, सेविका,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी,नगरपरिषद कर्मचारी, कोतवाल,पोलीस, पाटील असतील.

वरील पथकांवर स्थानिक ग्रामीण व शहरी पातळीवरील विषाणू संसर्ग रोखण्यासाठी खाली जबाबदारी सोपविण्यात येत आहे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवणे, त्यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे,गृह विलगीकरणातील तसेच रुग्ण आढळून आलेल्या घरास आस्थापनेचे प्रतिबंधात्मकतेचा फलक लावणे, प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये बाहेरील व्यक्तींचा वावर होणार नाही याची दक्षता घेणे, आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर अंगणवाडी सेविका हे एम.एम एम पी डब्ल्यू यांनी रुग्ण यांच्या संपर्कातील संशयितांचा शोध घ्यावा.

 

किमान वीस संशयितांची तपासणी करावी जास्तीत जास्त लोकसंख्या ची टेस्टिंग वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गावातील अथवा शहरी भागातील सुपर स्प्रेडर उदाहरणार्थ भाजीपाला विक्रेता,किराणा दुकानदार,हातगाडी, केस कर्तनालय यांची दोन वेळा तपासणी करणे प्रथम तपासणी नंतर पूर्ण सात दिवसांनी तपासणी करणे.

 

उपविभागातील जळगाव जामनेर तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रसार गाव प्रतिबंध घालण्यासाठी तालुक्यातील सर्व पथकांच्या कामकाजाचे सर्वेक्षण सर्वेक्षण तहसीलदार जळगाव,जामनेर यांनी करावे.तसेच उपरोक्त यंत्रांनी वरील त्यांचे काटेकोरपणे पालन करावे पदाधिकारी व कर्मचारी यांनी कामांमध्ये आपापसात समन्वय ठेवावा व तसेच शासकीय आदेश नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *