लोकमान्य विद्यालयास ‘तंबाखूमुक्त शाळा’ घोषित करून / “तंबाखूमुक्त ” शाळेचा दर्जा प्राप्त..!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- लोकमान्य विद्यालय या शाळेने तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे ९ निकष पूर्ण करुन तालुक्यातील तंबाखूमुक्त शाळा म्हणून सन्मान प्राप्त केला आहे.

सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभाग यांच्यातर्फे आयोजित राज्यव्यापी तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत अमळनेर येथील लोकमान्य विद्यालय ‘तंबाखूमुक्त’ झाल्याचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे यांनी जाहीर केले. लोकमान्य विद्यालयात शासनाच्या परिपत्रकानुसार विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.  घोषवाक्य बॅनरनिर्मिती, यलो लाईन कॅम्पियन आदींच्या माध्यमातून तंबाखूमुक्तीसाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर शाळेची माहिती ऑनलाइन स्वरूपात टोबॅको फ्री स्कूल अॅपवर सलाम मुंबई फाऊंडेशन यांना सादर करण्यात आली. याकामी उपशिक्षक भूषण महाले यांनी प्रयत्न केले. त्यांना मुख्याध्यापक रविंद्र लष्करे व सर्व शिक्षकांचे यांचे सहकार्य लाभले. गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन यांनी शाळेचे अभिनंदन केले. सलाम मुंबई फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने राबविले जात असलेले तंबाखू मुक्त शाळेसाठी उपशिक्षक भूषण महाले यांनी शाळेत तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी, व्यसनमुक्त कार्यशाळा, घोषवाक्य बॅनर निर्मिती असे विविध प्रकारचे उपक्रम राबविले असून मागील शैक्षणिक वर्षी त्यांनी तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतर्गत अमळनेर तालुक्यातील तालुका समन्वयक म्हणून २५६ पैकी १९० शाळा तंबाखू मुक्त करण्यास त्यांनी हातभार लावला. यावर्षीही आपल्या शाळेला तंबाखू मुक्त शाळा म्हणून सन्मान प्राप्त करुन दिला आहे. यासाठी त्यांना सलाम मुंबई फाऊंडेशनचे जयेश माळी यांचेही सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *