चाळीसगाव ट्रॉमा केअर सेंटर येथे तातडीने आरोग्य कर्मचारी वाढवा / खासदार उन्मेशदादा पाटील…! …!

चाळीसगाव ता.प्रतिनिधी :-  जिल्हाधिकारी श्री राऊत यांना भ्रमणध्वनी द्वारे निवेदन देत पाटील म्हणाले की माझ्या मतदारसंघातील चाळीसगाव शहराला लागून असलेल्या रेल्वे ब्रीज जवळील शासकीय दूध डेअरीच्या जागेवर अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जाचे  महात्मा फुले जन आरोग्य संकुल शासकीय ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  त्याठिकाणी कोविड स्पेशल रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. मी कोविशिल्ड लस घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली असता ,  या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची बाब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.पी.बाविस्कर यांनी लक्षात आणून दिली.त्याचवेळी आपणाशी  बोलून ही समस्या दूर करावी अशी मागणी केली होती. असून या पत्राद्वारे तातडीने ट्रॉमा केअर सेंटर येथे तातडीने कर्मचारी संख्या वाढवा अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

 

या बाबत सविस्तर माहिती अशी की खासदार उन्मेश दादा पाटील यांनी नुकतीच महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रॉमा केअर सेंटर  येथे स्वतः कोविशिल्ड लस घेऊन रुग्णालयाची पाहणी केली यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, प.स.सदस्य दिनेश बोरसे , सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.पी. बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

 याप्रसंगी डॉ. बावीस्कर यांनी कर्मचारी संख्या कमी असल्याची बाब लक्षात आणून दिली.कोविड सेंटर मध्ये आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता असताना एक स्टोअर कीपर, एक सिस्टर, दोन वार्ड बॉय हे कर्मचारी

कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्णांच्या सेवेत बाधा निर्माण झाली आहे. कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता येथे तातडीने अतिरिक्त वाढीव कर्मचारी नियुक्त करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांच्या कडे केली होती.

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी माननीय जिल्हाधिकारी यांना फोन करून  आपण आपल्या स्तरावर तातडीने चाळीसगाव ट्रॉमा केअर कोविड रुग्णालय येथे पंधरा ते पंचवीस कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून द्यावे जेणेकरून अधिक प्रभावी रुग्णसेवा जनतेला बहाल करणे सोयीचे होईल. अशी मागणी दूरध्वनी वर चर्चा करून केली होती.

 यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी सर्व विभागात जावून रुग्णांची विचारपूस केली. महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रॉमा केअर सेंटर येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चबुतरा बांधकाम पूर्ण झाले असून परिसरातील बगीचा पाहणी यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली. यावेळी बोलतांना ग्रामीण रुग्णालय अधिकारी .बाविस्कर म्हणाले की  उन्मेश पाटील आपल्या भक्कम पाठपुरावा आणि दूरदृष्टीतून ही भव्य दिव्य वास्तू आपण साकारल्यामुळे आज शेकडो रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

कोविड पॉझीटीव्ह कर्मचारी यांची खासदार उन्मेश  पाटील यांनी घेतली भेट

कोविड सेंटर मध्ये आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता असताना एक स्टोअर कीपर, एक सिस्टर, दोन वार्ड बॉय हे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्णांच्या सेवेत बाधा निर्माण झाली होती. या कोरोनाबाधित कर्मचारी यांची खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भेट घेतली. खासदार उन्मेश दादा यांनी त्यांना आधार देत लवकर बरे व्हा ही सदिच्छा व्यक्त केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *