माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदी सुनिल क्षिरसागर यांची निवड….!

निफाड ता. प्रतिनिधी :- तालुक्यातील विंचूर येथील सुनिल क्षिरसागर यांची  नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख  पदी नियूक्ती करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त 

माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे व राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष  महेश सारणीकर , राष्ट्रीय महासचिव – कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र राज्य सचिव इद्रिस सिद्दीकी  तसेच महाराष्ट्र संघटक – दिनेश शिंदे यांच्या शिफारसीने नाशिक संपर्क प्रमुख  पदी- सुनिल क्षिरसागर (विंचूर) निफाड यांची नियूक्ती करण्यात आली आहे. राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येय धोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

याबद्दल मित्र परिवार व संघटनेच्या मान्यवर कार्यकारणीने तसेच विंचूर पत्रकार संघाने यांचा  सत्कार समारंभ करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *