कनेकट्टीव्हिटी गेल्याने बडोदा बँकेची वाढली डोकेदुखी….!

लोहोणेर – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने बँक ऑफ बडोदा शाखेला  निवेदन :- 

देवळा ता. प्रतिनिधी :-  लोहोणेर येथील बँक ऑफ बडोदा शाखेत गेल्या १५ ते २० दिवसापासून नेटवर्क नसल्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार  झाले ठप्प असून , यामुळे परिसरातील बँकेचे ग्राहक, शेतकरी, व्यापारी, विध्यार्थी, गृहिणी यांना नाहक त्रास भोगावा लागत आहे.

 या लोहोणेर शाखेत वासोळ, खालप,महालपाटणे, सावकी, विठेवाडी, भऊर येथील , पतसंस्था , शाळा ,  यांची असंख्य खाती आहेत. नेटवर्क अभावी संगणक प्रणाली बंद असल्याने पैसे काढण्याचे व टाकण्याचे आर्थिक व्यवहार बंद पडल्याने ग्राहक चांगलेच हैराण झाले आहे. सदर नेटवर्क व बँक आर्थिक व्यवहार चालू करण्यासाठी लोहोणेर येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस च्या वतीने शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले, तसे न झाल्यास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे तालुका उपाध्यक्ष दिपक देशमुख यांनी सूचक इशारा दिला आहे , त्याप्रसंगी समता परिषदेचे रमेश आहिरे, लोहोणेर शाखाअध्यक्ष  मनोज देशमुख, देवळा तालुका कार्य.सदस्य अदित्य शेवाळे , सो.मीडिया ता. चिटणीस पंकज शेवाळे, सो.मीडिया ता.संघटक गणेश देशमुख, नागेश निकम, मनोज बच्छाव, अशोक सूर्यवंशी,समाधान पवार आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ   उपस्थित होते. इतकेच नव्हे तर तालुक्याचे आमदार  राहुल आहेर ,  खासदार भारती पवार  यांनी नागरिकांची झालेली परेशाणी दूर करावी व आपल्यास्थारावर बँकेची नेटवर्क विषयी समस्या सोडावी अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिक करीत आहेत. 

 

निवेदन सादर करतेवेळी शासनाच्या नियमावली नुसार सोशल डिस्टन्ससह मास्क परिधान करून सर्व अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करण्यात आले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *