महाराष्ट्रात गुटखा बंदी कागदावरच..? कासोद्यात मोठी कारवाई,सुमारे ९,१५,२०० रुपयांचा गुटखा जप्त – गुटखा किंग अटकेत…!

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी :-  महाराष्ट्र सरकारने गुटखा बंदी लागू केली असली तरी अद्यापही गुटखा विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण आणता आलेले नाही.  मुंबईबरोबरच राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही सर्रास गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव अन्न व औषध प्रशास व स्थानिक पोलिस प्रशंसानाने सयुंक्त रित्या कारवाई करीत एरंडोल तालुक्यातील कासोदा ग्रामपंचायत , हद्दीतील एका  दुकानातून विमल घुटक्याचे १५ ते २० पुडे जमा करून , 

गोपनीय माहितीच्या आधारे एरंडोल – भडगाव  रस्त्यावरील कासोद्यातील धान्यमार्केट समोरील गोपाल नगर बांभोरी शिवारातील पत्र्याच्या शेड असलेल्या गोदामात साठवणूक करून ठेवलेला तब्बल ९ लाख १५ हजार २००. रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.  गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत गोदामावर जाऊन पाहणी केली, व या ठिकाणी हजर असलेल्या व्यक्तीस विचारले असता , सदर व्यक्तीने दुकान व गोदाम आमचेच असल्याचे सांगितले, गोदामात गुटखा साठविला जात असल्याची माहिती जळगाव येथील अन्न व औषधी विभाग यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली होती. त्यानुसार  त्यांनी गोदामातून  विमल पान मसाल्याचे ४१६० कंपणी पॅक पाकिटे प्रत्येकी किंमत १८७ असी असून एकुण किंमत ७ लाख ७७ हजार ९२०रुपये चा व वि – १ तंबाखु एकूण ४१६० पॅक पाकिटे प्रत्येकी असा एकूण किंमत १ लाख ३७ हजार २८० रुपये चा साठा आढळून आला , सपोनि रविंद्र जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली,  दुकान मालक निलेश मधुकर चिंचोले वय ३३ याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

 अन्न व औषध प्रशासन यांच्यासह कासोदा पो.स्टे.चे सपोनि रविंद्र जाधव, पीएसआय नरेश ठाकरे, पो.कॉ.जितेश पाटील , पो.कॉ.समाधान तोंडे  , पो.कॉ.इम्रान खान यांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून पुढील तपास सपोनि रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नरेश ठाकरे हे करीत आहे.  कासोदा पोलिसांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.

कासोद्या सारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात  गुटखा विक्री होत असल्याने गुटखा माफियांचे जाळे अधिक वाढत असल्याचे दिसते. ही परिस्थिती चिंताजनक असून कासोद्याला गुटखा व तंबाकु मुक्त करण्यासाठी प्रथम अशा माफियांचा शोध घेणं गरजेचं ठरलं आहे. तर कासोद्यात घुटका किंग वाढल्याने युवा पिढी व्यसनाधीन झाली असून,  ही चिंताजनक बाब असल्याचे दिसून येते.                                            आणखी अश्याप्रकारच्या कारवाया कासोद्यात अजून होतील का , गावठी हात भट्टीच्या दारू साठी वापरण्यात येणारी सामग्री ही छोट्या –  मोठ्या किराणा दुकानातून विना परवानाच विक्री होते , यांकडे ही पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *