जळगाव जिल्ह्यामाहिती अधिकार व पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी समाधान पाटील….!

एरंडोल ता. प्रतिनिधी :-  एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील समाधान पाटील यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी नियूक्ती.

 माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे व राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर , राष्ट्रीय महासचिव – कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र राज्य सचिव इद्रिस सिद्दीकी  तसेच महाराष्ट्र संघटक – दिनेश शिंदे तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय विनोद गायकवाड यांच्या शिफारसीने जळगाव जिल्हा अध्यक्ष  पदी- समाधान पाटील  (वरखेडी) एरंडोल यांची नियूक्ती करण्यात आली आहे. राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येय धोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

 याबद्दल मित्र परिवार व संघटनेच्या मान्यवर कार्यकारणीने तसेच जळगाव जिल्ह्यातुन मित्र परिवारांनी  यांचा  मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *