बोरस्ते विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा…!

ओझर ता.निफाड  प्रतिनिधी :-  येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी हरित सेना प्रमुख  सुरेश शेटे यांनी चिमणी दिनाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले .

त्यांनी चिमण्यांचे संवर्धन व जागृती साठी २० मार्च हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या निमित्ताने आपण आपल्या परिसरात पक्षांना दाणा पाण्याची सोय केली , तर आपल्याला चिमण्या दिसू शकतील व इतर पक्षी सुद्धा पाहायला मिळतील पक्षी पर्यावरण संवर्धनाची महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले ,

याप्रसंगी  कार्यक्रमास विशाल कातकाडे महेश जाधव लक्ष्मण नेवकर आकाश गाडे सचिन टरले अनिल काळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *