नाशिक शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यक्षम महिलांचा गौरव….!

नाशिक जिल्हा प्रतिनिधी :- येथील शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने शालिमार येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर  विद्यार्थिनी वसतिगृहात शहरातील विविध क्षेत्रातील कार्यक्षम महिलांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी  माजी महापौर अशोक दिवे होते प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ नगरसेविका वत्सलाताई खैरे , वसतिगृहाचे सचिव पी.के.गायकवाड, आशाताई तडवी,निलेश (बबलू) खैरे,राजेंद्र बागुल,वंदना पाटील,उमाप मॅडम उपस्थित होत्या.

यावेळी , सारिका चंद्रकांत  नागरे , भारती अनिल साळवे, बेबी सुभाष डेर्ले, मंगला बाळकृष्ण काकड,सुरेखा भागवत पवार,रंजना  गोपीचंद देवरे,वैशाली अनंता नाठे,पूजा देवरे,आशा आहेर,सिंधू भास्कर  घुगे,अर्चना सुनील कडलग,संगीता राजेश  दाते,सुवर्णा सत्यम भामरे,सारिका विकास पवार,मंगला पवार,इंदिरा पवार,मीना साळवे यांचा गौरव करण्यात आला.यावेळी अशोक दिवे, वत्सलाताई खैरे,निलेश खैरे यांनी सर्व महिलांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.

स्वागत प्रास्ताविक पी के गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन आशाताई तडवी यांनी केले तर अधीक्षक बेबी डेर्ले यांनी आभार मानले यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *