गायक गणेश भोईर यांना मनुष्यबळ विकास अकादमीचा राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार जाहीर..!

कर्जत ता.प्रतिनिधी :-   गायक गणेश भोईर यांना मनुष्यबळ विकास अकादमीचा  राज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार जाहीर.. 

कर्जत तालुक्यातील कळंब जवळील पोही गावचे सुपुत्र गायक गणेश भोईर यांना  मनुष्यबळ विकास अकादमीचाराज्यस्तरीय आदर्श युवा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

गणेश भोईर हे पंचक्रोशीतील उत्कृष्ट गायक असून ते भजन ,भावगीत , भक्तिगीते गीत गायनाचे सादरीकरण करत असतात. आवाज महाराष्ट्राचा विजेते सुप्रसिद्ध गायक महेश कंठे यांच्या कडून गायनाचे धडे घेत गणेश यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे.तसेच मागच्या वर्षी झालेल्या सूर नवा मंच नवा या नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला असून 

त्यांच्या या कार्याची दखल घेत दिनांक १६ मे २०२१ रोजी मुंबई येथे  मनुष्यबळ विकास अकादमीच्या वतीने त्यांना यंदाचा राज्यस्तरीय आदर्श  युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक ऍड. कृष्णाजी जगदाळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *