कर्जत येथील बबन झोरे यांची आंतरराष्ट्रीय पॉवरलेफ्टिंग स्पर्धेत निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक….!

कर्जत ता.प्रतिनिधी :- तालुक्यातील खैराट गावातील बाबू रामचंद्र झोरे यांचे  सुपुत्र बबन झोरे राष्ट्रीय स्पर्धेत चमकले ,

भारत सरकार कडून नुकतेच झारखंड येथे झालेल्या ऑल इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील बबन झोरे यांनी दोन सुवर्णपदके मिळवली असून त्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कर्जत तालुक्यातील खैराट गावातील बाबू रामचंद्र झोरे यांचे  सुपुत्र बबन झोरे यांनी झारखंड येथे ऑल इंडिया पॉवरलेफ्टिंग स्पर्धेत २८ घटकराज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश यामध्ये झालेल्या सामन्यात २ सुवर्णपदक मिळवली असून उत्तम यश संपादन केल आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून या स्पर्धेत बबन झोरे हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.   या कामगिरीमुळे बबन झोरे यांनी कर्जत चे नाव संपूर्ण भारतात नावलौकिक केलं असल्याने  सर्वच स्तरावरून त्यांचं कौतुक होत आहेत, तसेच त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *