बुंधाटे व डांगसौंदाणे गाव तीन दिवस कडकडीत बंद / प्रशासनासह ग्रामस्थांचा निर्णय…!

बागलाण ता.प्रतिनिधी :-  बुंधाटे व डांगसौंदाणे गावात तीन दिवसांचा यशस्वी जनता कर्फ्यु….

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेन  थैमान घातले असून यावर कोरोना साथरोग संसर्गजन्य आजाराची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वोत्तपरी तयारी करीत असून. त्यांच्या कार्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यामधील बुंधाटे व  डांगसौंदाणे ग्रामपंचायत ने सर्वानुमते निर्णय घेत  तीन दिवसचा जनता कर्फ्यु पुकारून कडकडीत बंद लागू करण्यात आला आहे. या गावांमध्ये  अत्यावश्यक सेवाच चालू राहील.

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.२२, २३, व २४ मार्च पर्यंत गावात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात मेडिकल, दवाखाने ,बँकिंग सुविधा फक्त गावातील ग्रामस्थांसाठी अत्यावश्यकच कामासाठी  उपलब्ध असेल.  या व्यतिरिक्त गाव १००% पूर्ण कडकडीत बंद असणार आहे.  व्यवसाय करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आव्हान ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आली. तसेच कोणीही विना मास्क आढळून आल्यास दोनशे रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल असे आव्हाहन सरपंच , पोलीस प्रशासन यांनी केले आहे. 

ग्रामस्थांचा प्रतींसाद :-   आजचा दुसरा दिवस असून सर्वानुमते घेण्यात आलेल्या निर्णयामुळे कोणीही विनाकारण बाहेर फिरतांना दिसत नाही आहे. सर्वावत्र मेनचौक , बस स्टॉप सर्वच ठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे , पोलीस प्रशासन व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे कौतुक करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *