शिक्षक समितीचा उस्फुर्त कार्यक्रम / गरीब विद्यार्थ्यांना मोफत धान्यवाटप…!

कर्जत ता.प्रतिनिधी :- माथेरानच्या-दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना धान्य वाटप..

कर्जत जवळील माथेरान च्या कुशीत वसलेल्या मात्र विकासापासून नेहमीच उपेक्षित राहिलेल्या आसलवाडी, बेकरेवाडी, नाण्यांचा माळ, जुमापट्टी या वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील१८० विद्यार्थ्यांना शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने लखीचंद गुप्ता, सत्यपाल गुप्ता, आणि जनक गुप्ता यांनी या आदिवासी विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट चे वाटप करून मदतीचा हात दिला.

          कोरोनाचे संकट येऊन एक वर्ष पूर्ण होत आले कोरोना जाईल असे वाटत असतांनाच पुन्हा दुसरी लाट आली व रुग्णसंख्या वाढू लागली, त्यातच हातावर पोट असणाऱ्या कुटूंबाचे प्रचंड नुकसान झाले. अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. असलवाडी, बेकरेवाडी, नाण्यांचा माळ, जुमापट्टी या वाडी वरील कुटुंबे माथेरान येथे मजुरीची कामे करून आपला उदरनिर्वाह करतात परंतु लॉक डाउन मध्ये पर्यटन स्थळ बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती, धान्य मिळाल्याने या कुटूंबाना आधार मिळाला आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

      या प्रसंगी राजेश जाधव शिक्षक नेते रायगड,श्रीमती गीता पाटील मुख्याध्यापिका जुमापट्टी,आशिष उंबरे,आदर्श शिक्षक सुगवे माधुरी केदारी , वैशाली ढोले, छाया चव्हाण सुनील पारधी, भीमी पारधी, रुपेश मोरे  आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *