माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी स्वप्निल सोनवणे…!

जिल्हा प्रतिनिधी (समाधान पाटील) :- येथील पत्रकार गर्जना न्यूज चे मुख्य संपादक स्वप्निल सोनवणे यांची माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष  महेश सारणीकर , राष्ट्रीय महासचिव – कमलेश शेवाळे यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र राज्य सचिव – इद्रिस सिद्दीकी  तसेच महाराष्ट्र संघटक – दिनेश शिंदे तसेच उत्तर महाराष्ट विभागी विनोद गायकवाड. जळगाव जिल्हा अध्यक्ष समाधान पाटील यांच्या शिफारसीने जळगाव जिल्हा उपध्यक्ष  पदी- स्वप्निल सोनवणे (नंदगाव) जळगाव यांची नियूक्ती करण्यात आली आहे. राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येय धोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

 याबद्दल मित्र परिवार व गर्जना न्यूज परिवार व संघटनेच्या मान्यवर कार्यकारणीने तसेच जळगाव जिल्ह्यातुन मित्र परिवारांनी  यांचा  मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *