१५ वित्त आयोगाच्या निधीतून बळसाने गावाचा होणार विकास – सरपंच दरबारसिंग गिरासे…!

धुळे ता.प्रतिनिधी :- साक्री तालुक्यातील बळसाणे गाव हे जैन धर्मीयांचे श्रध्दांस्थान म्हणून पुर्ण राज्यभर प्रसिद्ध आहे, सर्विकडे नावलौकिक असलेले बळसाने हे गाव विकासापासून वंचीत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे,

यासाठी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासेव उपसरपंच महाविर जैन व सदस्यांनी गावातील समस्या लक्ष्यात घेता , १५ वित्त आयोगातील निधी खर्च करण्याचा एकमताने निर्णय घेतला.

गावात होते घाणीचे साम्राज्य…-

गटारीचे अशुध्द पाणी रस्त्यावर उतरून गावात घाणीचे साम्राज्य पसरवत होते. इतकेच नव्हे तर डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना निमंत्रण देण्यात येत होते ,
बळसाने गावाचे श्रद्धा असलेले गावातील जैन मंदिरावर ग्रामस्थांसह भारत- भारतातून येणाऱ्यां जैन बांधवांना या घाणीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.
यांसाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी
सांडपाण्याची समस्या सोडण्यासाठी भूमिगत गटारी बांधल्या तर अमरधाम येथे पेवर ब्लॉक बसविणे या कामाचे शुभारंभ लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी सरपंच उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी सांगितले की गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहील व गावाचा विकास होईल अशी ग्वाही सरपंच दरबार सिंग गिरासे यांनी दिली यावेळी सरपंच दरबार सिंग गिरासे उपसरपंच महाविर जैन ग्रामपंचायत सदस्य देविदास धनुरे,इंद्रसिंग गिरासे,सौ.ध्यानाबाई मालचे सौ. कल्पनाबाई गिरासे,सौ. मिराबाई खंडेकर सौ.जनाबाई मासुळे,प्रा.भूषण हलोरे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *