वरिष्ठांच्या आदेशानव्ये कासोदा पोलीस ठाण्यात वाहनांचा होणार लिलाव / सपोनि रविंद्र जाधव…!

कासोदा प्रतिनिधी :-  वर्षानुवर्षे कासोदा पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या वाहनांचा आता प्रशासनातर्फे लिलाव काढण्यात येणार आहे. बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी मोटरसायकल एकूण चार वाहनांची लिलाव प्रक्रिया होणार असल्याने वाहनांच्या मूळ मालकांनी मालकी हक्क, वारसा, तारण याबाबतचे मूळ दस्ताऐवज येत्या दहा दिवसांत सादर करून वाहन घेऊन जावे ,  अन्यथा मालकी हक्क असलेले मुळ दस्तऐवज सादर न केल्यास त्या वाहनांची प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव येथून मूल्यांकन करून मा. न्यायदंडाधिकारी तसेच कार्यकारी दंडाधिकारी एरंडोल यांचे कडून कायदेशीर लिलावाची परवानगी घेऊन सदरची वाहने हे रितसर लिलाव करून लिलावाची रक्कम सरकारी भरणा करण्यात येणार असल्याची माहिती कासोदा पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांनी दिली.

पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेल्या दुचाकीसह इतर वाहने खूप वर्षांपासून लावून ठेवलेली आहेत. यातील अनेक वाहनधारकांनी वाहन ताब्यात घेण्याबाबत अनास्था दाखवली आहे. त्यात अपघातासह गुन्ह्यातील वाहन घरी नको या मानसिकतेमुळेही वाहने पडून आहेत. पण यामुळे पोलीस ठाण्यांना बकालवस्था आली आहे. शिवाय या वाहनांची गणना, सुरक्षेचाही ताण वाढत आहे.

पोलीस ठाण्यांचे सुशोभिकरणासह इतर उपक्रम राबविण्यासही अडचणी येत आहेत. त्यामुळे सपोनि. रविंद्र जाधव यांनी बेवारस असलेली व ठाण्यात पडून असलेली वाहने मूळ मालकांना परत देणे किंवा त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ४ दुचाकी वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहेे.

कासोदा पोलीस स्टेशनमध्ये असलेली वाहने एकतर मूळ मालकांना परत देण्यात येतील किंवा त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. 

अशी माहिती सपोनि रवींद्र जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसारित केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *