नगरसेवक शेख कुर्बान यांच्याकडून गरजूंना शिरखुर्मा किटचे वाटप

फैजपूर प्रतिनिधी_ सध्या संपुर्ण

जगासह भारतातही कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले असून महाराष्ट्रातही संक्रमित रुग्णांची संख्या अधिक आढळून येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह जळगांव जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कोरोनाच्या प्राश्वभूमीवर एकीकडे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे . यात हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली असून त्यांची गरज भागवणे कामी येथील नगरसेवक शेख कुर्बान यांनी शहरातील ताहानगर, पठाणवाडी, इस्लामपूरा हजीरा मोहल्ला, मिल्लत नगर भागातील २०० गरजूंना प्रत्येकी ५०० रुपये व उत्तम दर्जाचे शिरखुर्मा किटचे वाटप केले . व यंदाची ईद मुस्लिम बांधवांनी घरीच राहून साजरी करावी आणी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच शहरातील गरजू नागरिकांना काही आर्थिक मदत लागल्यास सहकार्य केले जाईल असे आश्वासन शेख कुर्बान यांनी दिले.

त्याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, जिल्हा दूध संघ संचालक तथा जेष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी आदी उपस्थित होते.

सर्वांनी नगरसेवक शेख कुर्बान यांचे आभार मानून कौतुक ही केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *