सावदा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीसह परीचारीका यांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी कोरोना सुरक्षा किटचे वाटप

सावदा ( प्रतिनिधी )

देशात व राज्यात कोरोना या महामारीचे संकट आ वासून उभे असून शासन स्तरावरून अनेक उपाययोजना व मदत मोठ्या प्रमाणावर होत असून, विविध सामाजिक संस्था यांच्या कडून अत्यावश्यक वस्तूंची मदत नागरिकांना होत आहे. सावदा शहरात आरोग्यदूत म्हणून कार्य करणारे ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी कोरोना व्हायरस रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांनी आरोग्यमंत्री व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे आरोग्य साहित्य मिळणेसाठी तातडीने प्रयत्न करून आज आरोग्य रक्षणासाठी साहित्य मिळवुन दिले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे डॉक्टर ,नर्स , वर्डबॉय यांना 150 पी पी ई किट, एन 95चे 100 मास्क, एचसीओ टँब-200एमजी चे 200 सर्जिकल ग्लोज7. 5 नंबर चे 50, सर्जिकल 7.5 नंबर चे 100 ग्लोज , ट्रिपल फेस मास्क 500, व्हिटिएम किट 25, डिस्पोकँप 50. ईत्यादी आरोग्य रक्षणासाठी साहित्य मिळवून दिले आहे. सर्व साहित्य वाटप आज दि २२ रोजी ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले. याप्रसंगी डॉ. विघ्नेश्वर नायर, डॉ. शामवेल बारेला, डॉ. गणेश मराठे तसेच अधिपरीचारीका एल. एल. धनगर, ए. बी. महाले, सी. एम. कोल्हे, डी. डी. बेंडाळे, डी. व्हि. नाईक, यांच्या उपस्थितीत, युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज परदेशी, माजी नगरसेवक लाला चौधरी, सचिव शरद भारंबे, गौरव भेरवा यांनी वरील साहित्य येथील ग्रामीण रुग्णालयात दिले आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आणि रावेर तालुक्यातील नोडल अधिकारी डॉ. महाजन. यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ साहित्य मिळवून दिल्याने आमदारांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *