सह्याद्री प्रतिष्ठान शाखा भुसावळ तालुक्याक्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

चाळीसगांव तालुका प्रतिनिधी विकी पानकर :-

सद्या जगासह महाराष्ट्राला विळख्यात घेणाऱ्या कोरोणा व्हायरसमुळे जनता कर्फ्य , लॉक डाऊन सरकार ने सुरू केले आहे परंतु , या कालावधीत
महाराष्ट्र रक्त पुरवनार्या ब्लॅड बॅकेतील साठा लाॅकडाऊन मुळे कमी झाला असल्याकारणाने सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या गड-किल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विवीध शाखांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे . म्हणून आज सह्याद्री प्रतिष्ठान भुसावळ तालुक्याच्या वतीन धन्वंतरी ब्लड बँक येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या वेळी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराला सह्याद्री प्रतिष्ठानचे भुसावळ तालुका अध्यक्ष कल्पेश भांरबे ,कार्याध्यय कुंदन प्रकाश कोळी , खुशाल कोळी , रोशन सोनवण ,कैलश शर्मा , महेश शर्मा, रविंद्र परदेशी , हितेश राणे , रितीक भारंबे , रिशभ दाभाडे ,पंकज चौधरी यांनी नियोजन करून रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याने सर्वत्र या प्रतिष्ठानचे कौतुक केले जात आहे ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *